उचगांव / वार्ताहर
गांधीनगर (ता.करवीर ) पोलिस ठाण्याच्या चारचाकी गाडीला रात्रीची गस्त घालताना शुक्रवारी पहाटे मोठा अपघात झाला. चिंचवाड गांधीनगर रस्त्यावर महावीर कलेक्शन दुकानाजवळ हा अपघात घडला. यात एक पोलिस अधिकारी, चालक व पोलिस, होमगार्ड असे चारजण जखमी झाले. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत गांधीनगर पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंद झाला आहे.
चिंचवाड गांधीनगर रस्त्यावर शुक्रवारी पहाटे रात्रीची गस्त घालत असताना काहीतरी आडवे आल्याने गाडी रस्त्याकडेला असणाऱ्या पिंपळाच्या झाडाला जोरदार धडक बसली. यात पोलिस उपनिरीक्षक अतुल कदम यांना डोक्याला दुखापत झाली. तर चालक संजय कोले, पोलिस राजू चव्हाण, होमगार्ड तानाजी वळकुंजे हे जखमी झाले. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









