महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टची सामाजिक बांधिलकी
ओटवणे / प्रतिनिधी:
तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी भरवस्तीत शिरून घर जमीनदोस्त झालेल्या ओटवणे कापईवाडी येथील गवळी समाजातील विठोबा वरेकर यांच्या नुकसानीची गवळी समाजाच्या महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी ट्रस्टमार्फत पूरग्रस्त विठोबा वरेकर यांना दहा हजार मदतीचा धनादेश देऊन यापुढेही काही मदत लागल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोक दाते, विश्वस्त कृष्णा डाकरे, विश्वस्त युवराज गवळी, ट्रस्टचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे, सहसचिव कृष्णा पंदारे, सदस्य प्रशांत बुराण, सुरेश वरेकर, अण्णा केळुसकर, महिला सदस्य द्रौपदी पंदारे, संपदा चिले, माजी उपकार्याध्यक्ष रमेश वरेकर, माजी सदस्य प्रकाश केळुसकर आदी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारीणीचे पहिले कार्याध्यक्ष आणि जिल्ह्यातील गवळी समाजाला संघटित करण्यात मोलाचे योगदान दिलेल्या कै आत्माराम चिले यांच्या घरी जाऊन चिले कुटुबियांचं सांत्वन करण्यात आले. यावेळी कारीवडे गावातील सेवानिवृत्त पणन अधिकारी नामदेव गवळी यांच्या गो शाळेला भेट देण्यात आली. तसेच गवळी समाजाचे ‘भाव अंतरीचे हळवे’ फेम ‘गवळीरत्न’ मयूर गवळी यांच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.









