प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक सरकारच्या प्रदूषण विभागाने शाडूमातीपासून तयार केलेल्या मूर्तीमुळे प्रदूषण होते, म्हणून हळदीची गणेशमूर्ती करण्याचे लोकांना आवाहन केले आहे. त्यासाठी या वषी 10 लक्ष हळदीचे गणपती निर्माण करण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. हे धर्मशास्त्राच्या विरुद्ध असून श्रीगणेश तत्त्व शाडूमातीपासून तयार केलेल्या मूर्तीमध्ये होते. त्यामुळे प्रदुषणाच्या नांवाखाली विसर्जनावर बंदी घालण्यात येवू नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने मनपाकडे करण्यात आली आहे.
माती किंवा शाडु पासून केलेल्या गणेशमुर्तीचा सर्व भक्तांना श्रीगणेश तत्त्वाचा लाभ होतो. तसेच भक्तांना आध्यात्मकि लाभ होतो. पण वर्षातून एकदा येणाऱया गणेशोत्सवामुळे प्रदूषण होते असा दावा सरकार आणि पर्यावरणवादी करीत आहेत. हिंदू धर्माचरणाच्या विषयात हस्तक्षेप करून वाहत्या पाण्यात पारंपारिक पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जित करण्यास विरोध करतात. त्यामुळे गणेशभक्तांना कृत्रिम हौदात श्री मुर्ती विसर्जन करण्याची परिस्थिती येऊन ठेपली आहे. कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा नदी, समुद्र, तलाव, खाणी अशा अयोग्य ठिकाणी फेकून दिल्या जातात. त्यामुळे प्रदूषण रक्षण केवळ दिखावा झाला आहे, की खरोखरच प्रदूषण होते. या विषयी संशय निर्माण होतो. कृत्रिम हौद, तलावात विसर्जित केलेल्या अथवा दान म्हणून घेतलेल्या मूर्तीचे पालिका प्रशासन पुढे काय करते? त्या कुठे विसर्जित करतात ? या संदर्भात पालिकेच्या बैठकीत काही निर्णय झाला आहे
का ? याची माहिती माहितीहक्क अधिकाराखाली विचारली असता. ‘माहिती नाही ’ असे उत्तर मिळाले. गणेशभक्तांनी विश्वासाने दिलेल्या गणेशमूर्तीचे पावित्र्य रक्षण करून विसर्जन करणे अपेक्षित आहे, परंतु तसे न केल्याने अनेक ठिकाणी त्याचे पालन होताना दिसत नाही. म्हणून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रतिवषी लक्षावधी रू . खर्च करून कृत्रिम तलाव तयार करू नयेत. त्या ऐवजी मूर्ती विसर्जनाच्या बाबतीत 2010 ला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार गणेश मूर्ती विसर्जनासाठी जलाशयात अथवा तलावात एका कोपऱयात बांधलेल्या तलावात गणेश भक्तांना गणेशमूर्तीचे विसर्जन
करावे.
त्यामुळे पालिकेचे लक्षावधी रूपये वाचतील. अनादी कालापासून चालत आलेल्या रूढी, परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात विसर्जन करण्यास आक्षेप घेऊ नये. ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’, रासायनिक रंग, विघटन न होणाऱया वस्तूंऐवजी शाडुमातीची आणि नैसर्गिक रंगाने तयार केलेली गणेशमूर्ती प्रशासनाने प्राधान्य द्यावे. तसेच मूर्तिकारांनादेखील प्रोत्साहन द्यावे, ही विनंती निवेदनवाव्दारे हिंदू जनजगृती समितीचे सुधीर हेरेकर यांनी दिले आहे.









