प्रतिनिधी / बेळगाव
गणेशपूर येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मोहिमेचे उद्घाटन प्रांताधिकारी करलिंगण्णावर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार आर. के. कुलकर्णी, ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी गणेशपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जे. पी. खेमजी यांनी स्वागत केले. यावेळी 200 नागरिकांना लस देण्यात आली. तर सर्वांनी लस घ्यावी तसेच कोरोना टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी करलिंगण्णावर यांनी केले.
यावेळी आशा कार्यकर्त्या, ग्राम लेखाधिकारी व ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते.









