कुंभारजुवे /प्रतिनिधी
खोली पंचायतीच्या उपसंरपचपदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवा नाईक यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच अच्य?त धुळापकर यांची सरपंचपदी निवड झाल्याने हे पद रिकामेच होते
खोली? पंचायतीत नुकत्याच झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पंचसदस्य शिवा नाईक यांचा एकमेव अजॅ आल्याने त्याची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. याप्रसंगी सरपंच अच्य?त धुळापकर पंच सदस्य चंद्रशेखर काणकोणकर, समृद्धी कुंडईकर, सुमन धुळापकर, कायतान पो, आदी उपस्थित होते. निवडणुकीचे निरीक्षक म्हणून तिसवाडी गट विकास काया?लयाचे महेश कुट्टीकर उपस्थित होते. उपसरपंचपदी शिवा नाईक यांची निवड झाल्याने या पंचायत क्षेत्रात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.









