पोलिसांच्या धडक कारवाईत 2 दुचाकीही जप्त
प्रतिनिधी/ खेड
भरणे येथील साई रिसॉर्टजवळ व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांना येथील पोलिसांच्या पथकाने अटक केली. माशाच्या उलटीसह दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
काही व्यक्ती लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनवणे, खवटीचे वनरक्षक रानबा बंबर्गेकर यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने भरणे येथील साई रिसॉर्टजवळ सापळा रचला. या रिसॉर्टजवळून तिघेजण दोन दुचाकीवरून संशयितरित्या जाताना पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने तिघांनाही थांबवून झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात असलेल्या एका पिशवीत व्हेल माशाची उलटी आढळली. या तिघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अन्य व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता गृहित धरत पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
या पथकात पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल मोरे, येथील पोलीस स्थानकातील कॉन्स्टेबल जोगी, माने, जगताप, कोरे यांचा समावेश होता.









