करमाळा / प्रतिनिधी
शेलगाव (क) येथील भरत सोमनाथ माने (वय-57) यांचे खूनप्रकरणातील संशयित आरोपी आण्णा सोपान माने (वय 60, रा. शेलगाव (क) यास करमाळा पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले.
न्यायाधीश आर.ए. शिवरात्री यांनी त्यास 25 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आण्णा माने विरूध्द गुन्हा दाखल केल्यानंतर कालच पोलीसांनी त्यास अटक केली करून आज न्यायालयात हजर केले. तपासाकामी सात दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. आरोपीच्या वतीने ॲड. दत्तात्रय सोनवणे यांनी पोलीस कोठडीस विरोध केला. त्यानंतर न्यायाधीशांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.