ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉक डाऊनची घोषणा केली आहे. यातच मे च्या पहिल्याच दिवशी सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.
विना अनुदानित एलपीजी सिलेंडर च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. दिल्लीत 14.2 किलोचा सिलेंडर 162.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आता नवीन किंमत 581.50 रुपये झाली आहे. तर 19 किलोचा सिलेंडर256 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
मुंबईत विना अनुदानित सिलेंडरची किंमत 714.50 वरून 579 झाली आहे. कोलकाता मध्ये 774.50 वरून 584.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 761.50 वरून 569.50 रुपये झाले आहेत.
19 किलो एलपीजी सिलेंडरमध्ये 256 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. यापूर्वी गॅस सिलेंडरची किंमत 1285.50 रुपये होती. जी आता 1 मे पासून 1029.50 रुपयांवर आली आहे.
त्याचप्रमाणे त्याचे दर कोलकाता मध्ये 1086.00 रुपये, मुंबईत 978 रुपये आणि चेन्नईमध्ये 1144.50 रुपयांवर आले आहेत.









