माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा इशारा : आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या संघर्ष पदयात्रेत सिद्धरामय्या यांचा सहभाग
वार्ताहर /खानापूर
कर्नाटकातील भ्रष्ट सरकार शेतकऱयांच्या समस्या सोडवण्यात अयशस्वी ठरले आहे. राज्यातील समस्या सरकारच्या निदर्शनाला आणूनही त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्त्यांचे, शाळांचे तसेच गोरगरीब शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. पण याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. भाजप केवळ सरकार चालवण्याचे काम करत आहे, पण जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतीच पावले उचलत नसल्याने हे सरकार म्हणजे निद्रिस्त सरकार आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.
खानापूर तालुक्मयाच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर ते सुवर्णसौधपर्यंत काढलेल्या 40 कि. मी. पदयात्रा सांगताप्रसंगी ते सुवर्णसौध याठिकाणी आंदोलनकर्त्यांशी बोलत होते.
यावेळी त्यांच्यासमवेत कर्नाटक राज्य प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी, आमदार गणेश हुक्केरी, आमदार डॉ. यतींन्द यांच्यासह अनेक पदाधिकाऱयांनी या संघर्ष पदयात्रेला पाठिंबा दर्शविला.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, आपण मुख्यमंत्री असताना देखील राज्यात अतिवृष्टी झाली होती. तसेच शेतकऱयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी आपण तातडीने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला होता. पण गेल्या तीन वर्षांत निद्रिस्त भाजप सरकारने राज्यात अनेक समस्या असतानाही त्या सोडवण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही.
यावषी तब्बल 31 जिल्हय़ांमध्ये या अतिवृष्टीचा फटका बसला असून 31 लाखाहून अधिक एकर भात पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी खात्याने दाखविला आहे. पण सरकारने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. खानापूर तालुक्मयात झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे. त्याची आपण स्वतः पाहणी केली. त्या ठिकाणी भेट देऊन जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या व त्या सोडविण्याचे आपण आश्वासन दिले होते. खानापूर तालुक्मयात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे अनेक शेतकऱयांची घरे पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पिके पाण्याखाली गेली. रस्ते तसेच अंगणवाडय़ा, दवाखाने यांची परिस्थिती गंभीर बनली होती. याची प्रत्यक्ष पाहणी करून राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करूनही खानापूर तालुक्मयासाठी विशेष पॅकेज देण्यासाठी सरकारने कोणतीच पावले उचलली नाहीत. यामुळेच खानापूर तालुक्मयाच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सरकारच्या विरोधात संघर्ष पदयात्रा काढून याकडे लक्ष वेधले आहे. या संघर्ष पदयात्रेत खानापूर तालुका तसेच बेळगाव तालुक्मयातील अनेक नागरिकांनी मोठा सहभाग दर्शवून आपल्या समस्या सरकारच्या निदर्शनाला आणून दिल्या आहेत. याबद्दल सर्व आंदोलनकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. बेळगाव येथे सुरू असलेल्या या आंदोलनात खानापूर तालुक्मयासाठी विशेष पॅकेज मंजूर करण्यासाठी सरकारवर दबाव आणून यात नक्कीच यश मिळेल, असा आशावाद त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर तालुका मागासलेला तालुका असून या तालुक्मयात अनेक समस्या आहेत. व्यवस्थित वीजपुरवठा नाही, रस्ते करण्यासाठी वनखात्याची अडचण, बस आगाराची, रस्त्यांची समस्या, गेल्या तीन वर्षांत गोरगरिबांना घरे नाहीत. यासाठी अनेकवेळा पाठपुरावा करूनही भाजप सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला. खानापूर तालुक्मयात काँग्रेसचे आमदार असल्याने भाजप सरकार आपल्या समस्यांचे निवारण करत नाही म्हणूनच या संघर्ष पदयात्रेचे आयोजन करणे भाग पडले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हय़ातील अनेक आमदार, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









