मंत्री निराणी यांची माहिती
बेळगाव
खानापूर तालुक्मयाचा औद्योगिक विकास करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. औद्योगिक वसाहतीसाठी 1 हजार एकर जमिनीचे भू-संपादन केले जाणार आहे. खानापूर रेल्वेस्थानकानजीक ही औद्योगिक वसाहत उभारली जाणार असल्याची माहिती लघु व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री मुरुगेश निराणी यांनी शनिवारी दिली.
हुबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘टायकॉन-22’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बेळगाव तालुक्मयात औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. याचसोबत खानापूर तालुक्मयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. खानापूर तालुक्मयाचा अद्याप औद्योगिक विकास झालेला नाही. त्यामुळे स्थानिकांना रोजगारासाठी इतर तालुक्मयांवर अवलंबून राहावे लागत आहे. औद्योगिक वसाहत झाल्यास रोजगार वाढीसह खानापूरच्या विकासालाही गती मिळेल, असे या कार्यक्रमात सांगण्यात आले.
कित्तूरनजीक आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासंदर्भात चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. राज्यात रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रावर भर दिला जात असून खानापूर रेल्वेस्थानकानजीक सुसज्ज अशी औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मंत्री निराणी यांनी सांगितले.
कित्तूरजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय विमानतळ
राज्यातील भांडवल गुंतवणूकस्नेही धोरणामुळे उद्योजक गौतम अदानी राज्यात 500 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी पुढे आले आहेत. या गुंतवणुकीसंदर्भात अदानी गुपशी प्राथमिक टप्प्यातील चर्चा झाली आहे. या ग्रुपकडून राज्यात तीन प्रमुख गुंतवणूक होणार आहेत. बेळगाव व हुबळीच्या दरम्यान असणाऱया कित्तूर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे. तर सांबरा आणि हुबळीतील विमानतळ हे देशांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी राहतील, अशी माहितीही निराणी यांनी यावेळी दिली.









