स्वतः 8 हून अधिक रुग्ण दाखल : रुग्णांवर अधिक उपचारासाठी वेळोवेळी सूचना
वार्ताहर / खानापूर
खानापूर श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला गेल्या दोन तीन दिवसात तालुक्मयातील शहरी व ग्रामीण डॉक्टरसह अनेकांचे सहकार्य लाभले आहे
या तीन दिवसांमध्ये या कोविड केअर सेंटरमध्ये जवळपास आठ ते दहा रुग्ण दाखल झाले असून उपचारासाठी रुग्णांचा या सेंटरकडे कल वाढला आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये खानापूर तालुक्मयातील तालुका डॉक्टर असोसिएशनच्या अनेक ग्रामीण व शहरी डॉक्टरांनी उपचारासाठी कार्य हाती घेतले असून, दिवसभरात अनेक डॉक्टरांनी या सेंटरला भेट देऊन रुग्णांची दखल घेतली. अतिगंभीर आजार असलेल्या रुग्णांवर अधिक उपचारासाठी वेळोवेळी सूचना केल्या.
याकामी खानापूरचे डॉ. पांडुरंग पाटील डॉ. फयाज कित्तूर, डॉ. सुनील पाटील, डॉ. किरण पाटील डॉ. विनायक घाडी, डॉ. वैभव भालकेकर, डॉ. सागर नार्वेकर, डॉ. नाडगौडा, डॉ. अमर मोरे, डॉ. नागराज भ्रमणावर, डॉ. मदन कुंभार, डॉ. वाटर,s डॉ. परूशेठ, डॉ. सुळकर आदी डॉक्टरांनी या सेंटरला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
मदत करणाऱयांनी समितीच्या पदाधिकाऱयांची संपर्क साधावा
बुधवारी अनेक डॉक्टरांनी सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णांची तपासणी करुन योग्य सल्ला देऊन उपचाराबाबत काळजी घेतली. या सेंटरमध्ये डॉ. मोहन पाटील नर्स मयुरी पाटील, लियाना लिमा हे 24 तास सेवा बजावत आहेत. याकामी खानापूर तालुका श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्या महालक्ष्मी केअर सेंटरचे मार्गदर्शक विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष किरण येळूरकर, उपाध्यक्ष पंडित ओगले, कार्यदर्शी सदानंद पाटील यांच्यासह भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, युवा कार्यकर्ते साहील ओगले, राजू गावडे, संजू गुरव, आकाश अथणीकर, नागेंद्र पाटील, सिद्धार्थ कपलेश्वरी, गोपाळ भेकणे, राहुल भजत्री, राजू करंबळकर, संतोष दप्तरदार, किरण बाचोळकर, मारुती जाधव, जॉर्डन गोन्साल्विस, नारायण पाटील आदीजण यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
या सेंटरमध्ये आलेल्या सर्व रुग्णांसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे शिवाय अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यापुढे सेंटरमध्ये कुणाला स्वच्छेने सेवा बजावायची आहे किंवा मदत करावयाची आहे. अशांनी समितीच्या पदाधिकाऱयांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.









