खानापूर / वार्ताहर
खानापूर नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील चार प्रभागांसाठी मंगळवारी मतदान झाले. यात चुरशीने ८६.६९ टक्के मतदान झाले. नगरपंचायतच्या १७ पैकी १३ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान झाले होते. या सर्व जागांचा निकाल बुधवारी होणार आहे. खानापूर नगरपंचायतवर कुणाची सत्ता येणार हे बुधवारी दुपारपर्यंत स्पष्ट होईल.
खानापूर नगरपंचायतच्या प्रभाग क्र. नऊ, ११, १३ व १६ या प्रभागासाठी चुरशीने मतदान झाले. यात प्रभाग नऊ मध्ये ८८.४२, प्रभाग ११ मध्ये ८७.७४, प्रभाग १३ मध्ये ८५.१४ व प्रभाग १६ मध्ये ८५.५० टक्के मतदान झाले. नगरपंचायतसाठी शिवसेना- काँग्रेस महाविकास आघाडी, जनता आघाडी भारतीय जनता पक्ष अशी तिरंगी लढत होत आहे. यात कोण बाजी मारणार हे उद्या निकालानंतर स्पष्ट होईल.