मागील 8 महिन्याच्या तुलनेत 11.62 लाख टनावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील खाद्यतेलाची आयात जून महिन्यात 11.62 लाख टनाच्या घरात पोहोचली आहे. ही आकडेवारी मागील आठ महिन्याच्या खाद्यतेलाच्या तुलनेत सर्वाधिक आयात राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. सदर कालावधीत पाम तेलाच्या खपामध्ये मोठी घसरण झाल्याचे पहावयास मिळाले आहे, अशी माहिती तेल उद्योगाची प्रमुख संघटना साल्वेंट एक्सट्रक्टर्स असोसिएशन (एसईए)यांनी दिली आहे.
जगामध्ये वनस्पती तेलाचे प्रमुख खरेदीदार असणाऱया देशांमध्ये भारताने मागील वर्षात याच महिन्यात 10.71 लाख टन खाद्य तेलाची आयात केली आहे. परंतु तेल वर्ष 2019-20 च्या दरम्यान नोव्हेंबरपासून जूनपर्यतचा कालावधी पाहिल्यास खाद्यतेलाची आयात 15 टक्क्मयांनी घटून 80.51 लाख टनावर राहिली आहे. जी एक वर्षाच्या समान कालावधीच्या दरम्यान 94.55 लाख टन होती. ही घसरण होण्याचे मुख्य कारण आरबीडी पामोलीनच्या आयातीमधील घसरण सांगितली जात आहे. तेल वर्ष 2019-20 मधील मागील आठ महिन्यामध्ये जूनमध्ये ही आयात सर्वाधिक प्रमाणात राहिली आहे.









