सांगली / प्रतिनिधी
15 मे नंतर लॉकडाऊन संपल्यानंतर खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणे यांचा सुरळीत पुरवठा व्हावा या दृष्टीने कृषि निविष्ठांची दुकाने काही काळ उघडी ठेवण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक-2021 पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सींगव्दारे घेण्यात आली. या बैठकीस सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार अरूण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, तहसिलदार, उपविभागीय कृषि अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व्हीडिओ कॉन्फरन्सींगव्दारे उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात खरीप हंगाम व्यवस्थितपणे पार पडावा यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांचा सुलभ व सुरळीतपणे पुरवठा व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मागेल त्याला शेततळे व पांडुरंग फुंडकर फळबाग योजने अंतर्गत प्रलंबित अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर पालकमंत्री जयंत पाटील यांनी सदर अनुदान देण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









