खानापुरात जिल्हा कृषी निरीक्षकांची विपेत्यांना सूचना : सर्वसामान्य खत विपेत्यांचेही अधिकाऱयांना साकडे
वार्ताहर /खानापूर
खरीप हंगामाला पंधरवडय़ात सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना माफक दरात व व्यवस्थित रासायनिक खत पुरवठा करण्यासाठी कृषी खात्याने कंबर कसली आहे. तालुक्मयातील मान्यताप्राप्त खत विपेत्यांनी शेतकऱयांना रासायनिक खते ही एफआरपी दरामध्ये विक्री करावीत, अधिक दराने विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा कृषी साहाय्यक निर्देशक एच. डी. कोळेकर यांनी तालुक्मयातील खत विपेत्यांना दिला. सोमवारी येथील कृषी खात्याच्यावतीने तालुक्मयातील खत विपेत्यांची बैठक बोलावून नियमावलीची माहिती दिली.
यावेळी कोळेकर म्हणाले, यावषी रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱयांना योग्य दरामध्ये खत पुरवठा झाला पाहिजे. अनेक व्यावसायिक अधिक दराने खत विक्री करत असल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱयांवर अन्याय होणार नाही, माफक दरामध्ये खत विक्री करावी, प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या दुकानातील रासायनिक खताचा साठा पॉईंट ऑफ सेल अर्थात पीओएस मशीनमध्ये वेळोवेळी दाखल करावा, खताचे दर नामफलकावर लावण्यात यावेत. प्रत्येक दुकानदाराने अधिकृत परवान्याची प्रत दुकानात लावावी. या संदर्भात कृषी खात्याला वेळेवर माहिती द्यावी, अशा अनेक सूचना खत विपेत्यांना केल्या.
तालुका कृषी साहाय्यक निर्देशक डी. बी. चव्हाण यांनी तालुक्मयात यावषी खताचा तुटवडा पडणार नाही, यासाठी प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. याकरिता प्रत्येक खत विपेत्याने आपल्या दुकानातील खतसाठा वेळेवर खाली करून अहवाल पाठवावा. अधिक दराने खत विक्री झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगून शेतकऱयांना खरीप हंगामात योग्य मात्रा देणारी खते पुरवावीत. औषधाच्या फवारणीसंदर्भात अथवा कीटकनाशक औषधांचे प्रमाण व योग्य माहिती शेतकऱयांना द्यावी, अशा सूचना त्यांनी खत विपेत्यांना केल्या.
यावेळी खत विपेत्यांनीही आपल्या समस्या मांडल्या. एकीकडे खताचे दर वाढले असताना यूरिया अथवा डीएपी खताबरोबर अतिरिक्त खताची लिंक होलसेल विपेते करत असल्याने अनेक सर्वसामान्य विपेते अडचणीत येत आहेत. त्यासाठी लिंक खत देण्यावर निर्बंध आणावेत, अशी मागणी खत विपेत्यांनी केली.
डी. बी. चव्हाण यांचे अभिनंदन
यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन अधिकाऱयांनी दिले. बैठकीत कृषी साहाय्यक निर्देशक डी. बी. चव्हाण यांना नुकताच कामगार दिनाच्या निमित्ताने जिल्हा पातळीवर सेवा प्रशस्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल तालुका खत विपेता संघाच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी तालुक्मयातील खत विपेते, कृषी खात्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.









