प्रतिनिधी/ मायणी
खटाव तालुक्यातील 35 गावांमध्ये 15 पेक्षा जास्त बाधित रुग्ण असल्याने प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी संबंधित गावे चौदा दिवसांसाठी लॉकडाऊन केली आहेत. या गावांमध्ये अचानक कोरोना बाधित संख्या वाढल्याने प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. यामध्ये वडूज, खटाव, वरुड, शिरसवडी, दरुज, औंध, खातगुण, नडवळ, चितळी, कलेढोण, कळंबी, एनकूळ, चोराडे, बुध, भुरकवडी, विसापूर, निमसोड, कटगुण, डिस्कळ, गोपुज, निढळ, मायणी, रेवळकरवाडी, धोंडेवाडी, त्रिमली, पुसेसावळी, तडवळे, गुरसाळे, राजाचे कुर्ले, शेगाव, वडगाव जयराम स्वामी, वर्धनगड, जाखणगाव, कुरोली सिद्धेश्वर व येरळवाडी ही गावे असून या गावांमध्ये बाधित क्षेत्र जाहीर केले आहे. येथील नागरिकांनी घरातच थांबून प्रतिबंधक उपाय करावेत लक्षणे दिसल्यास ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्राची संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी सुशीलकुमार तुरकमाने यांनी केले आहे.









