प्रतिनिधी / नागठाणे
पिरेवाडी ( ता.सातारा ) येथील युवकाला शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळल्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या चार वन कर्मचार्यांपैकी एकाला बोरगाव पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले. महेश साहेबराव सोनवले ( वय.२८,रा.घोट,ता.पाटण) असे या वन कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी त्याला जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील वनपालासह अन्य दोन वनसंरक्षक अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहेत.
पिकांचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या पिरेवाडी येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी शिकारीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळले होते. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती. याची तक्रार ओंकार शिंदे याने ५ सप्टेंबरमध्ये बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी वनपाल योगेश पुनाजी गावित, वनसंरक्षक महेश साहेबराव सोनवले, रणजित व्यंकटराव काकडे, किशोर ज्ञानदेव ढाणे या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही पोलिसांना गुंगारा देत होते.
या दरम्यान त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. तर उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळणार हे लक्षात येताच संशयितांनी अर्ज मागे काढून घेतला होता. अखेर बुधवारी सायंकाळी वनसंरक्षक महेश सोनवले याला बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









