मुंबई / प्रतिनिधी
आर्यन खानला (Aryan Khan) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्यावर एका दिवसानंतर, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शुक्रवारी एनसीबी झोनल ऑफिसर समीर वानखेडे (Samir Wankhede) यांच्यामार्फत क्रूझ ड्रग प्रकरण हे “भाजपचे षडयंत्र ” असल्याचा पुनरुच्चार केला.ज्यामुळे महाराष्ट्र, महाराष्ट्रील लोक आणि बॉलीवूड इंडस्ट्रीची (Bollywood) बदनामी झाली आहे.
“माझं ठाम मत आहे की महाराष्ट्र सरकारला, तेथील लोकांना बदनाम करण्याचे षडयंत्र,वानखेडेच्या माध्यमातून राबवले जात आहे आणि या सगळ्यामागे भाजपचा हात आहे.” असे मलिक म्हणाले.बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केल्यावर हा कट सुरू झाल्याचे सांगताना,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडामध्ये फिल्मसिटी निर्माण केल्याचा संदर्भ देत मलिक म्हणाले.“आमच्या बॉलीवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असुन ते मुंबईबाहेर उत्तर प्रदेशात नेण्याचा प्रयत्न केला जात आहे”
मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला वारंवार “बनावट”म्हणून संबोधले असुन वानखेडेवर बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि नोकरी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर यासह अनेक आरोप केले आहेत.मलिक यांनी “चित्रपट उद्योगाशी खेळ खेळण्यासाठी” केंद्राने वानखेडेला एनसीबीमध्ये कसे आणले यावर प्रकाश टाकला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








