मुंबई/प्रतिनिधी
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. समीर वानखेडेंवर आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची डील केली होती. त्यापैकी ८ कोटी वानखेडेंना मिळणार होते. असा आरोप पंच प्रभाकर साईलने केल्याने समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत.या गंभीर आरोपांनंतर समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने वेळोवेळी पलटवार केला आहे. पण दररोज एक नवीन आरोप समीर वानखेडेंवर होत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याने आता क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. “एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय, तुम्ही योग्य तो न्याय करा,” अशी विनंती क्रांतीने उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली आहे.
क्रांती रेडकरचे संपूर्ण पत्र