प्रतिनिधी/ म्हापसा
उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके यांच्या नेतृत्वाखाली खास बैठक म्हापसा उत्तर गोवा कार्यालयात झाली. येत्या 2020 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात चालत असून त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. कोविडच्या काळात काँग्रेसच्या मंडळाध्यक्षांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सर्व अध्यक्षांचे कौतुक करण्यात आले अशी माहिती श्री. भिके यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अनंत नाईक, चंदन मांद्रेकर, भोलानाथ घाडी उपस्थित होते.
ते म्हणाले, यापुढेही कोविडसाठी काँग्रेसचे काम चालूच राहाणार असून आम्ही आमच्या दृष्टीने मदत करण्यात येणार आहे. काँग्रेसने युवा पीढीला आता नव्हे तर 2017 पासूनच साथ दिली आहे. आमचे वरीष्ठ नेते आहेत त्यांच्या मदतीने आम्ही पुढे जात आहेत.
फुटिरांना पुन्हा स्थान नाही
जे कुणी फुटून गेले आहे त्यांना पुन्हा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण त्यांच्या विरोधात न्यायालयात केस सुरू आहे. प्रत्येक गट आपापल्या परीने काम करीत आहेत. निवडणुकीत काँग्रेसचेच चेहरे आसणार आहे. जे कुणी गेले आहे त्यांना पुन्हा प्रवेश देऊ नये आणि जे कुणी काम करीत आहेत त्यांनी जोरात काम करावे व येत्या काळात काँग्रेस विकासाच्या कामात अधिक अक्रमक होणार आहेत अशी माहिती भिके यांनी दिली. जे कुणी गेले आहेत त्यांचा निर्णय हाय कमांड घेत नाही. सरकारला सध्या जनतेचे काहीच पडलेले नाही. सरकारचे जे गरजेचे विषय आहेत ते आम्ही उचलून धरणार आहोत असे ते म्हणाले. रमेश पणशीकर व संदीप नाईक (पर्ये) मतदारसंघ यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.









