ग्राहक, हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
वार्ताहर /कोवाड
लोकमान्य सोसायटीचे कौतुक बाहेरून ऐकले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी 27 वर्षापूर्वी उदात्त हेतू डोळय़ासमोर ठेवून लोकमान्य सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर ‘लोकमान्य’ने अल्पावधीच गल्ली ते दिल्लीपर्यंत धडक दिली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी केले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखा स्थलांतरप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. स्थलांतरीत शाखेचे उद्घाटन कल्लाप्पा भोगण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकमान्य सोसायटीच्या असंख्य ग्राहक, हितचिंतकाकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
जि.प. सदस्य भोगण म्हणाले, देशात अनेक राज्ये आहेत. पण सहकारामुळे प्रगती झाली ती केवळ महाराष्ट्राचीच. पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचे मोठे जाळे आहे. मधल्या काळात शासनाच्या जाचक नियमांमुळे महाराष्ट्रातील अनेक सहकारी संस्था हडबडल्या होत्या. परंतु लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीने समाजाभिमुख सहकाराला चांगली दिशा दिली आहे. चंदगड तालुका निर्सगसंपन्न आहे. तालुक्मयाला चांगले सुसंस्कार आहेत. कोवाड पंचक्रोशीत ऊसाला जास्त महत्व दिले जाते. तालुक्मयाच्या पश्चिम भागात काजूचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. तालुक्मयात चंदगड व कोवाड येथे लोकमान्य सोसायटीच्या शाखा आहेत. या शाखांमुळे आर्थिक विकासात भर पडली आहे.
ज्ये÷ संचालक गजानन धामणेकर म्हणाले, कोवाड येथे लोकमान्य शाखेची 11 वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवली. इतर शाखांप्रमाणेही या शाखेने अल्पावधीतच गरुडभरारी घेतली. तालुक्मयाचा दुग्ध व्यवसाय मोठा आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या हातात चलन येते. यास बचतीचा योग्य मार्ग व चांगला व्याजाचा परतावा लोकमान्य सोसायटीने दिला आहे. तालुक्मयातील शेतकरी कुटुंबातील अनेक विद्यार्थी तालुक्यातच शिक्षण घेऊन देश, विदेशात चमकत आहेत. ही मुले तालुक्मयाचे नाव कमवत आहेत. याचा लोकमान्य संस्थेला अभिमान आहे. संस्थेतर्फे देशसेवेचा उदात्त हेतू ठेवून संस्थेचे व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी यांच्या नेतृत्वाखाली बेळगांव परिसरातील 40 गावांतील तरूणांना सैनिकी प्रशिक्षण दिले जाते.
संस्थेचे चिफ फायनान्सर ऑफीसर वीरसिंह भोसले म्हणाले, संस्थेच्या प्रगतीत अनेक छोटे-मोठे अडथळे आले. मात्र अशा आव्हानांना पेलून संस्थेला पुढे घेऊन जाणे हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुरसाहेब यांचे खास वैशि÷य़ आहे. त्यांच्या या कार्यातूनच संस्थेची समाजात वेगळी प्रति÷ा निर्माण झाली आहे. संस्थेच्या सभासद ठेवीदारांकडून संस्थेविषयी विश्वासार्हता निर्माण झाली आहे. त्यामुळेच संस्थेची प्रगती झाली आहे.
क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील म्हणाले, लोकमान्यच्या कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, दिल्ली राज्यात 213 शाखा आहेत. कोल्हापूर जिल्हय़ात 23 शाखा कार्यरत आहेत. कोल्हापूर विभागाने 400 कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. ठेवीची सुरक्षितता, सर्वोत्तम परतावा, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेच्या बळावर संस्थेची घोडदौड सुरू आहे. याबरोबरच सामाजिक भावनेतून संस्थेने लोककल्प फौंडेशनची स्थापना करून बेळगांव जिल्हय़ातील कणकुंभी, जाबोटी परिसरातील 32 खेडी दत्तक घेऊन तेथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधला आहे.
यावेळी व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी, मार्केटिंग मॅनेजर अभय पाटील, सेल्स मार्केटिंग एक्झ्युकेटीव्ह ऋतूराज दळवी, चंदगड तालुका सेवानिवृत शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष वसंत जोशिलकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी इमारत मालक सौ. सुजाता पाटील, राजू पाटील, कार्यकर्ते मयुर हजारे यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सरपंच अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक जाधव, ग्रा. प. सदस्य रामचंद्र व्हन्याळकर, संचालक सुबोध गावडे, को-ऑर्डिनेटर ऑफीसर विनायक जाधव, किसन लाड, प्रविण सायनेकर, प्रशांत हुलजी, सभासद, ठेवीदार डॉ. सटुप्पा भोगण, सुर्यकांत पाटील, लक्ष्मण बामणे, कल्लाप्पा वांदे, बी. के. पाटील, मुकुंद व्हन्याळकर, मंगेश कुलकर्णी, असिस्टन्ट मॅनेजर आय. टी. अनिश जामसंडेकर, सेल्स मॅनेजर डॉ. आप्पासाहेब जांभळे, सौ. सुमती जांभळे, याकूब मुल्ला, रमेश पाटील, सौ. सुनिता राजगोळकर, नलुताई मुरकुटे, रेणुका नरेवाडकर, विद्या पाटील, रेखा पाटील, अनंत जोशिलकर, प्रा. एन. जी. वांदे, धोंडीबा पाटील, चंद्रकांत वांदे, जगदिश अंगडी, शिवानंद गणाचारी, सुर्यकांत गजरे, मल्लिकार्जुन वाली, श्रीकांत पाटील उपस्थित होते. शाखाधिकारी गोविंद दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. सहायक क्षेत्रीय व्यवस्थापक राजाराम पाटील यांनी आभार मानले. नियोजन सहाय्यक शाखाधिकारी रमेश देसाई, लिपीक जोतिबा गावडे, स्मिता मोहनेगकर, अरुण रेडेकर, अनिल कुंभार यांनी केले.









