वार्ताहर / कोवाड
कोवाड ता. चंदगड येथे आज शुक्रवार दि.7 रोजी सायंकाळी 6 पर्यंत पूरस्थीती जैसे थे अशी परीस्थीती आहे. मात्र आज दिवसभर पाऊसाची उघड झाप सुरु आहे. मध्ये सूर्याचे हे दर्शन झाले आहे. त्यामूळे येत्या काही तासात पूर ओसरण्याची चिन्हे आहेत. त्यामूळे ग्रामस्थांनी, बाझार पेठेतील व्यापारी बंधूनी सूटकेचा निश्वास सोडला आहे.
गुरुवारी महापूराला सुरवात झाली. त्या दिवशी झपाट्याने नदीपात्राबाहेर आली. बगता बगता बाझार पेठेत पाणी शिरले. गेल्या वर्षाच्या अनूभवा मूळे दुकानदारांनी आपले साहित्य सुरक्षीत ठिकाणी हलवले तर बाझार पेठेत राहणाऱ्या काही कूठूंबांनी धोका ओळखून अगोदरच स्थलांतर केले. यामूळे यावर्षी जीवघेण संकट टळलं आहे. मात्र गेल्यावर्षी पेक्षा कितीतरी पटीने ऊस पिकांची गावोगावी हाणी झाली आहे. सबंध चंदगड तालुक्यातील हजारो एकर ऊस वादळी वाऱ्याने भूईसपाट झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या जमीनदोस्त झालेल्या ऊस पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
Previous Articleसिरमने जाहीर केली कोरोनावरील लसीची किंमत; बनवणार 10 कोटी डोस
Next Article पुणे विभागातील 84, 602 रुग्ण कोरोनामुक्त!








