लाखोंचे नुकसान : अनमोड चेकनाक्याजवळ दुर्घटना
वार्ताहर/ रामनगर
गोवा-वास्को येथून कोप्पळ या ठिकाणी कोक पावडर वाहतूक करणारा बारा चाकी ट्रक क्र. केए 22 सी 3987 हा अनमोड आरटीओ चेकनाक्याजवळ आला असता सदर वाहतुकीची कागदपत्र दाखविण्यासाठी थांबला असता शॉर्टसर्किटने अचानक पेट घेण्यास सुरुवात झाली. यामुळे चालक व क्लीनर खाली उतरले असता हँडबेकही न लावल्याने उतार असल्याने ट्रक काही अंतर जाऊन कलंडली व वाहनाने पेट घेतला. या ठिकाणी व्यवस्थीतपणे नेटवर्कही नसल्याने अग्निशमन दलाला फोन केला असता प्रथम गोवा-फोंडा येथून येईल, असे सांगितले. परंतु कर्नाटक हद्द असल्याने दोन तासाच्या विलंबानंतर खानापूर येथून अग्निशमन दलाची गाडी येऊन आग आटोक्यात आणली. सदर घटना गुरुवारी पहाटे 5.30 वाजता घडल्याचे सांगण्यात आले. घटना समजताच रामनगर पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील व सहकाऱयांनी धाव घेऊन घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला..









