प्रतिनिधी / कोल्हापूर
मुंबई व पुण्याच्या धर्तीवरच कोल्हापुरात जवळपास 100 एकर जागेमध्ये भव्य आयटी पार्क उभा करणार आहे. यासंदर्भात लवकरच उद्योजकांशी बैठक घेणार आहे. कोल्हापुरात आयटी पार्कची निर्मिती व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे उद्योजकांना तत्काळ जागा आणि सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोल्हापुरात आयटी पार्कची निर्मिती झाल्यास विकासाला गती मिळणार आहे असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
कागल तालुक्यात श्री अन्नपूर्णा साखर प्रकल्पाच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अनेक उद्योगांशी चर्चा सुरू; लवकरच करार
कोल्हापुरात आयटी पार्क व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अनेक उद्योगांशी आमची चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबतचे करार सुद्धा करण्यात येणार आहेत. मुंबई आणि पुण्यामधील हिंजवडीप्रमाणेच कोल्हापुरात सुद्धा भव्य आयटी पार्क करण्याबाबत जय्यत तयारी सुरू आहे. उद्योग आणि मोठÎा कंपनी नसल्यामुळे अनेकजण नोकरीसाठी परदेशात जातात मात्र त्यांना आता बाहेर जावे लागणार नाही, यासाठी कोल्हापूर जिह्यातील सर्वच नेते मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जे कोल्हापुरात बनते तो दर्जा इतरत्र मिळत नाही
कोल्हापूरमध्ये जे बनते त्याचा दर्जा इतरत्र कुठेही मिळत नाही, हा आपला लौकिक आहे. पहिली सहकारी वसाहत राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली होती. हाच वारसा आपल्याला अधिक पुढे नेण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही जोमाने प्रयत्न करत असून लवकरच कोल्हापुरात मोठ-मोठे उद्योग घेऊन येणार असल्याचेही सुभाष देसाई यांनी यावेळी सींगतले.
Previous Articleशाहुवाडी तालुक्यातील खेळते धनगरवाडा येथे युवकाची आत्महत्या
Next Article सांगलीत गुरूवारी ओबीसी महामेळावा









