प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूरसह परिसराला सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. आज दुपारपासूनच शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील रस्त्यावरून पाणी वाहत आहे. तसेच ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत.
दरम्यान, मान्सून सुरू होण्यापूर्वीच पावसाने दमदार हजेरी लावल्याने लोकांनी पावसाळ्याची तयारी सुरू केली आहे. आज शहरातील दुकानांसमोर रेनकोट, छत्री खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी दिसत होती. त्यातच दुपारनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने लोकांची तारांबळ उडाली.