नवी मुंबई – खारघर येथील पहिले पोलॅरीस हॉस्पीटल ठरले कोरोना रूग्णासाठी वरदान
वारणानगर / दिलीप पाटील
नवी मुंबईत कोरोना रूग्णावर उपचार करण्यासाठी कोणतेच हॉस्पीटल पुढे आले नाही खाजगी हॉस्पीटलला कोरोना सेंटर चालू करायला स्थानिक नागरिक, हॉस्पीटल असणाऱ्या ठिकाणच्या रहिवाशी सोसायट्या यांचा प्रारंभाच्या काळात विरोध या सर्वावर मार्ग काढीत खारघर येथील पोलॅरीश हॉस्पीटलने पहिल्यांदा सुरू केलेली कोरोना रुग्णांची सेवा आता सर्वाना वरदान वाटू लागली आसून ही किमया कोल्हापूरचा सुपूत्र डॉ.अजिक्य भिमराव भंडारी मूळगांव नरंदे ता. हातकंणगले यांनी करीत साहशी कोरोना योद्ध्याचे कर्तव्य बजावले आहे.
कोरोनाचा कहर वाढू लागल्यावर – नवी मुंबई मधील बरीच हॉस्पीटल बंद ठेवण्यात अालेली त्याचे कारणच मुळात ते ? सिरियस होते. डॉक्टर असले तरी स्वत्ताच्या जीवाशी खेळायची कुणाचीच इच्छा नव्हती सोबत लॉकडाऊन जाहीर झाल्यानतर बहुतांश हॉस्पीटलच्या नर्स, ज्यूनियर डॉक्टर व इतर हॉस्पीटल कर्मचारी गावी निघून गेले,जे होते ते घरी घाबरून बसलेले.
पनवेल महापालिका क्षेत्रात एकही खाजगी हॉस्पीटल कोरोनावर उपचार करायला पुढे सरसावले नाही नागरिकांना सरकारी हॉस्पीटलचाच आधार होता यावर पर्याय म्हणून पोलॅरीश हॉस्पीटलच्या माध्यमातून आम्ही डीसीएचसी समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्र चालू करण्याचा निर्णय घेवून तसा प्रस्ताव सादर केलेवर पालिकेने तो मंजूर करून कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यास मंजूरी दिली याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकानी कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यास विरोध केला, आंदोलन केले, डॉक्टरांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या इतर उपचार करा परंतु कोरोनाचे इथे चालू केले तर याद राखा अशी ताकीद दिली आम्हाला माघार घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही अशी परस्थिती प्रारंभी निर्माण झाल्याचे डॉ. अजिक्य भंडारी यानी सांगीतले.
कोरोना रूग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली होती.लोकोपुढे उपचारासाठी दुसरा पर्याय नव्हता.या परस्थितीचे गांभीर्य समजून आम्ही लढायचे ठरवले. हॉस्पीटल मधील दाखल असणाऱ्या रूग्णावर उपचार करून त्यांना घरी सोडले. पुन्हा नवीन कोव्हिड हॉस्पीटल साठी मंजूरी घेतल्यावर पुन्हा आंदोलन सुरू झाले हॉस्पीटलचा स्टाफ रहात असलेल्या सोसायटीत त्यांना बहिस्कृत केले, वॉचमनला हाकलले हर एक प्रकारे लोकानी विरोध केला या त्रासाने जुन्या स्टाफने नोकरी सोडली नवीन स्टाफ भरला तो देखील कोरोनासाठी काम करायला तयार नव्हता त्यांना समजावले पगार तीन पट वाढवला एवढ्या त्रासाने कोरोना रूग्णालय सुरु करण्याचा मार्ग सुकर झाला काही त्रास पचवले, सोसले तरिही समाज कल्याणासाठी काम करताना समाजातून मिळणारी हिन दर्जाची वागणूक
वेदनादायक ठरली असल्याचे डॉ.अजिक्य भंडारी यानी सांगीतले.
पनवेल पालिकेने केलेल्या आवाहनास डॉ. भंडारी यांचे पोलॅरीश वगळता कोरोनावर उपचार करायला एकही खाजगी हॉस्पीटल पुढे आले नाही याची खंत आयुक्त सुधाकर देशमुख यानी व्यक्त केली पालिकेने डॉ. अजिक्य भंडारी यांना कोरोनाच्या खास पथकात समावेश केला जसे रुग्ण वाढू लागले बेड कमी पडायला लागल्यावर सर्वच जन पोलॅरीशच्या समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रात दाखल होऊ लागले तेथील होणारे उपचार तिथे देण्यात आलेला मानसिक अधार याबद्दल समाधान व्यक्त होऊ लागले हॉस्पीटलमधील वाढत्या रुग्णसंखेवर नियत्रण मिळवण्यासाठी रूग्णांना होम क्वॉरटाईन करून उपचार करून बरे केले आंदोलनात पुढाकार घेणारे व सहभागी असणाऱ्यांना देखील कोरोना बाधा झाल्यावर याच हॉस्पीटल मध्ये उपचार केले त्यामुळे प्रारंभी झालेला झालेला विरोध, आंदोलन हे सर्व वातावरण बदलण्यास प्रारंभ झाला आणि आज कोरोना रुग्णासाठी हे हॉस्पीटल वरदान ठरल्याची भावना खारगर मधील जनतेत रूजू लागली आसून पत्नी डॉ. प्रियांका भंडारी याच्यासह सर्व स्टाफच्या कामाची दखल घेवून लोकानी कौतुक करीत सत्कारही केल्याचे डॉ. अजिक्य भंडारी यानी सांगितले.
आ. प्रशांत ठाकूर, लक्षपूर्ती फेडरेशनच्या मंजुषा परब,नगरसेवक किरण पाटील, प्रविण पाटील, गुरुनाथ गायकर,भाजपाचे शहरप्रमुख ब्रिजेश पटेल, उपप्रमुख निर्दोष किणी यांचे सहकार्य तसेच वेळोवेळी आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त संजय शिंदे यांनी मार्गदर्शन करीत कामाचे कौतुक केले असल्याचे डॉ. अजिक्य भंडारी यानी सांगीतले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









