प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेतील स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांनी आज दि.10 आपल्या पदाचा राजीनामा दिला.स्थायी समिती सभेत कवाळे यांनी राजीनामा देत वैयक्तीक कारणास्तव स्वच्छेने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.संदीप कवाळे यांची 11 फेब्रुवारी 2020 रोजी सभापती म्हणून निवड झाली होती.सहा महिन्याच्या कालावधीत त्यांनी शहरातील विविध कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.कवाळे यांच्या राजीनाम्यानंतर इच्छुकांनी सभापतीपदासाठी फिल्डिंग लावली आहे.








