प्रतिनिधी / सरवडे
येथील कुंभारवाडा विभागात एका व्यक्तीच्या घराचे नवीन बांधकाम सुरु आहे. त्याठिकाणी गॅलरीसाठी टाकलेला स्लॅब खोलताना अंगावर कोसळून सेंट्रींग कामगाराचा जागीच मृत्यू झाला. मयत कामगार कासारपुतळे गावचा असून युवराज सुर्यवंशी असे त्याचे नाव आहे.









