गोकुळ शिरगाव / वार्ताहर
संशयातून रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील कणेरी (ता. करवीर ) येथे ही घटना घडली आहे.
कणेरी (ता. करवीर ) येथील माधव नगर, एकता कॉलनी येथे गुरुवारी (दि .16) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. निशिकांत सुरेश चव्हाण (वय-32) याने संशयातून रागाच्या भरात पत्नी कोमल निशिकांत चव्हाण (28) हिचा गळा आवळून खून केला.
घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे स.पो.नि प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई सुरु केली आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.
Previous Articleतेलंगणा : बलात्कार करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला रेल्वे रुळावर
Next Article जावलीत वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार









