प्रतिनिधी / कुरुंदवाड
शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि घोसरवाडच्या विविध संस्थांचे संस्थापक मानसिंग शंकरराव खोत ( वय 58) यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. मानसिंग खोत हे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक व खंदे कार्यकर्ते होते. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत घोसरवाड मध्ये विविध विकासकामे करून गावाचा विकास साधला होता . या माध्यमातून त्यांनी घोसरवाड येथे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्योग समूहाच्या माध्यमातून विविध संस्था निर्माण केल्या होत्या.
मानसिंग खोत यांनी आपल्या उपसभापती पदाच्या कारकिर्दीत शासनाच्या विविध योजनांचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला होता. नृसिंहवाडी येथील साळुंखे महाराज यांच्या अन्नछत्र ट्रस्टचे संचालक म्हणून तसेच त्या विभागात ते गेल्या अनेक वर्षापासून सेवेकरी म्हणून कार्यरत होते. मानसिंग खोत यांच्या निधनाने राजकारण समाजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सून मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









