प्रतिनिधी / शिरोळ
पश्चिम महाराष्ट्र छत्रपती शाहू रेसिंग असोसिएशनच्या मान्यतेने शिरोळ तालुका बैलगाडी मालक चालक संघटनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना निवेदन देण्यात आले.
ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी यांच्या जिवाभावाचे मित्र म्हणजे बैल शेतकरी आपल्या शेतामध्ये बैलांच्या साह्याने मशागतीची कामे करून आपला उदरनिर्वाह करीत असताना केंद्र शासनाने २ जुलै दोन हजार अकराच्या नविन परिपतकामधये बैलांचे वगीकरण जंगली प्राण्यांमध्ये केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा गळा घोटणयाचे काम केंद्र शासनाने केले आहे शेकडो वर्षांपासून गावागावात यात्रा उरूसामधील आकर्षक म्हणजे बैलगाडी शर्यत या परिपत्रकामुळे राज्यातील बैलगाडी शर्यत पूर्णपणे बंद झाले आहेत बैलास जंगली प्राण्यांचे वर्गीकरण आतून मुक्त करण्यात यावे व बैलगाडी शर्यत सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.









