प्रतिनिधी/शाहुवाडी
शिरगाव (ता.शाहुवाडी) येथे सटवाई नावाच्या शेताजवळ पुरूष जातीचे १ महीन्याचे अर्भक आढळले होते. याप्रकरणी शाहुवाडी पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा नोद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरगाव येथील आनंदा साधू सावंत यांच्या सटवाई नावाच्या शेताजवळ ओढ्याच्या पाण्यात एक महिन्याचे पुरूष जातीच अर्भक काल, सोमवारी (दि.27) सकाळी अकराच्या सुमारास निदर्शनास आले होते. या विरोधात शाहुवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. कडक संचारबंदी असतानाही शिवाय सदर गाव बफर झोन परीसरात असताना देखील हे असे धाडस कोणी केली असेल याची ही चर्चा परीसरात जोर धरू लागली. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील प्रकाश पोतदार यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास पी.एस.आय प्रियांका सराटे करीत आहेत.








