चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या भरतीबाबतीत शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे अन्यायकारक आदेश
प्रतिनिधी/पेठ वडगाव
शाळेमधील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या भरतीबाबतीत शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या अन्यायकारक आदेशाची पेठवडगाव परिसरातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी होळी केली. तसेच १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. हातकणंगले तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष अभिजित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या आदेशाची होळी करण्यात आली. परिसरातील शंभरावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.
राज्य शासनाच्यावतीने शिक्षण विभागाकरिता ११ डिसेंबर रोजी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत काढण्यात आलेल्या अन्यायकारक आदेशाची पेठवडगाव येथील बळवंतराव यादव विद्यालयाच्या क्रीडांगणावर होळी करण्यात आली. यावेळी हातकणंगले तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी या शासनाच्या आदेशाचा तीव्र शब्दात निषेध करून हा आदेश त्वरित मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. आदेशाची होळी करण्यापूर्वी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘अन्यायकारक आदेश रद्द झालाच पाहिजे ‘या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी बळवंतराव यादव विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप पाटील, वरिष्ठ लिपिक अल्लाबक्ष शेख, राजू माने, पिंटू जाधव, राजू भोसले, नसीर मुलानी, अरुण नायकवडी, शरद पाटील, प्रकाश घोरपडे, मच्छिंद्र वडर, शरद धनवडे, संजय पवार (टोप )दिलीप चौगुले (आळते) संपत चौगुले, उत्तम चव्हाण (खोची), दीपक हाके (नरंदे )संजय मोरे अमर भाई (पेठवडगाव), शरद सणगर (शिरोली) संजय धोंगडे( लाटवडे) लक्ष्मण पाटील (भादोले), सयाजी पाटील (सावर्डे) तसेच परिसरातील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









