आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांची नियुक्ती माता, बालसंगोपन योजनेसाठी
कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत आशा' स्वयंसेविकांची नियुक्ती झाली. गटप्रवर्तक नियुक्त केले. आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या कामात वाढ झाली. सद्यस्थितीत पन्नासहून अधिक हेडखाली त्यांना काम करावे लागत आहे. शहरात 220
आशा’ंसाठी फक्त एकच गटप्रवर्तक आहे. त्यातून गटप्रवर्तकांना सोसावा लागणार ताण समोर आला आहे. आता गटप्रवर्तक न्यायासाठी संघटीत होत आहेत.
केंद्रीय महिला, बालकल्याण आणि आरोग्य मंत्रालयाने 2005 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान राबवण्यास सुरूवात केली. यावेळी नियुक्त केलेल्या आशा स्वयंसेविकांना मानधन कमी होते, आशा गट प्रवर्तकांना 25 रूपये मिळत होते. 15 वर्षांनंतर मानधनात वाढ झाली असली तरी जबाबदाऱयाही वाढल्या आहेत. राज्यात सद्यस्थितीत 3900 आशा गटप्रवर्तक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची संख्या 240 आहे. कोल्हापूर शहराची लोकसंख्या सात लाखांवर आहे. पण 220 आशा स्वयंसेविकांसाठी फक्त एकच गटप्रवर्तक आहे.
माता, बालसंगोपन योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आशा स्वयंसेविकांची नियुक्ती झाली, त्यांच्यावर गर्भवती माता, प्रसुती झालेल्या माता, नवजात बालकांना लसीकरण आदींची माहिती देणे आणि सर्वेक्षणाची जबाबदारी होती. हळूहळू आशा स्वयंसेविकांच्या जबाबदारींत वाढ होत गेली. कोरोना काळात आशा स्वंयसेविकांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आशा स्वयंसेविका संघटीत झाल्याने त्यांना बऱयाच मागण्या मान्य झाल्या आहेत. आशा स्वयंसेविकांवर गटप्रवर्तक नियुक्त केल्या आहेत. त्यांच्यावर आशांना मार्गदर्शन करण्याची, त्यांना मदत करण्याची जबाबदारी आहे. सद्यस्थितीत आशा गटप्रवर्तकांना 55 पेक्षा अधिक हेडखाली काम करावे लागत असल्याचे चित्र आहे.
आशा गटप्रवर्तकांवर पंचायत समितींसह ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा टार्गेटसाठी दबाव असतो. आता तर बीएसएलसी अंतर्गत आशा स्वयंसेविकांवर विविध बँकींग सेवेच्या जबाबदाऱया पडल्या आहेत. त्यांचे शिक्षण कमी असल्याने ही काम पर्यायाने गटप्रर्वतकांवर आली आहेत. त्यामुळे आशा स्वयंसेविकांना `मोटिव्हेट’ करताना गटप्रर्वतकांची मात्र कोंडी होत आहेत. त्यातूनच गटप्रर्वतक संघटीतपणे लढा देण्यासाठी सक्रीय झाल्या आहेत. यासंदर्भातील आशा, गटप्रवर्तक युनियनच्या रविवारी झालेल्या जिल्हा मेळाव्यांत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
सद्यस्थितीत 56 ते 75 हेडच्या कामाचा ताण,
महाराष्ट्रात 3900 गटप्रवर्तक, जिल्ह्यात 240,