प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनाचा सामुहिक संसर्ग सुरू आहे. कोमार्बिड रूग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यासह परजिल्ह्यांतून सीपीआरमध्ये हायरिस्क रूग्ण येत आहेत. त्याचा ताण सीपीआर हॉस्पिटलवर आहे. सीपीआर हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन दिवसांतील कोरोना मृत्यूत कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील बळींची संख्या 40 टक्क्यांपर्यत आहे. अन्य तालुक्यांतील बळींची संख्या कमी आहे. कोरोना मृत्यूदर नियंत्रणासाठी सीपीआरमधील स्टाफ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
जिल्ह्यात ऑगस्टपासून कोरोनाचा सामुहिक संसर्ग सुरू आहे. कोरोना प्रतिबंधासाठी जनता कर्फ्यु पाळला जात आहे. तरीही सामुहिक संसर्गाची साखळी तोडण्यात अपयश येत आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 40 हजारांवर पोहोचली आहे. 29 हजारांपर्यत रूग्ण जरी कोरोनामुक्त झाले असले तरी रोज सरासरी 10 हजारांहून अधिक कोरोना रूग्ण समोर येत आहेत. त्यात हायरिस्क रूग्णांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात या रूग्णांसाठी जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालये, केअर सेंटरमध्ये व्हेटिलेटर, ऑक्सिजनेटेड बेडची संख्या 7 हजारांपर्यत आहे. खासगी हॉस्पिटल्समध्ये त्याची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे हायरिस्क रूग्णांना व्हेटिलेटर, ऑक्सिजनेटेड बेडसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.
सीपीआर कोरोना हॉस्पिटलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारील सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच कर्नाटकातून हायरिस्क रूग्ण उपचारासाठी पाठवले जात आहेत. त्याचा ताण सीपीआरवर वाढत आहे. येथे पॉझिटिव्ह, हायरिस्क 550 हून अधिक रूग्णांवर उपचार केले जात आहेत. पण उशिरा येणाऱया हायरिस्क रूग्णांना वाचवण्यासाठी वैद्यकीय स्टाफला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. त्यातून कोरोना मृत्यूदराची टक्केवारी वाढत आहे. पण मृत्यूदराच्या टक्केवारीत सीपीआरमधील संख्या अधिक दिसत आहे. पण वस्तुस्थिती पाहता सीपीआरमधील मृत्यूदर बऱयाच प्रमाणात नियंत्रणात आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील मृत्यूचा आकडा हा शहरात सरासरी 10 ते 12 आणि करवीरमध्ये तो 8 ते 10 आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूदर हा शहरासह करवीर तालुक्यात असल्याचे समोर आले आहे. शहरातील खासगी हॉस्पिटल्समध्येही कोरोनाने मृत्यू होणाऱयांत स्थानिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यासाठी आणखी दोन कोरोना हॉस्पिटल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने ही यंत्रणा उभारल्यास मृत्यूदर नियंत्रणात येणार असून सीपीआरवर येणारा ताणही कमी होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









