प्रतिनिधी / गारगोटी
श्रीमती लक्ष्मीबाई आनंदराव देसाई यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले आहे. मामी या नावानेच त्या सर्वपरिचित होत्या.त्या कै.आनंदराव कोंडिबा देसाई (आबाजी) माजी आमदार यांच्या पत्नी तसेच माजी आमदार बजरंग आ. देसाई,बिद्रीचे माजी संचालक प्रकाश आ.देसाई,अमरावतीचे डी.वाय.एस.पी.रणजित देसाई यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्यामागे मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.








