शाहुवाडी / प्रतिनिधी
मलकापूर शहरात 9 महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र बेशिस्तपणे रस्त्याच्या बाजूला गाडी पार्क करून जाणाऱ्यांची संख्या मात्र वाढू लागल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुन्हा एकदा पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या आठ ते नऊ महिने लॉकडाउन चा कडक कालावधी होता सर्वत्रच कोरोना संक्रमणाची भीती होती या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरावर सतर्कता घेतली होती मात्र आता काही दिवसापासून लॉक डाऊन शिथील झाले आहे आणि सर्वांनाच मोकळे मैदान मिळाल्यासारखे झाले आहे. माणसांची गर्दी त्यातच वाहनांची कोंडी अशा पुन्हा एकदा वाहतूक कोंडीच्या समस्येत मलकापूर शहर अडकू लागले आहे. आता ऊस तोडणी सुरू झाली आहे आणि शाळीनाका व पेरीड नाका या वळणावर च्या ठिकाणी कायमच वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
बेशिस्त पार्किंग डोकेदुखी
मलकापूर शहरात भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीत महत्त्वाची भूमिका ठरत आहे. बेशिस्त वाहन पार्किंग धारकांची मलकापूर शहरात प्रवेश केल्यानंतर जागा मिळेल त्या रस्त्याच्या कडेला वाहन आरामात पार करून लॉक झाल्याची खात्री करून बाजारात फेरफटका व खरेदीसाठी जाणारे अनेक जण वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत आता ऊस तोडणी सुरू झाली आहे. त्यातच काही दिवसात बॉक्साईट वाहतूक ही होणार आहे मुंबईला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सची संख्याही वाढतच आहे मात्र शहरातील वाहतूक कोंडी चा होणारा हा प्रश्न थांबणार कधी असा प्रश्न सर्व नागरिकांच्या तून पुढे येतो आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









