प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेचे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त सर्जेराव गणपतराव चव्हाण (वय 71, रा. गवंडी मोहल्ला, जुना बुधवार पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, दोन भाऊ, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चव्हाण यांनी जकात निरीक्षक म्हणून महापालिकेतील सेवेला प्रारंभ केला.
त्यानंतर त्यांनी विविध पदावर काम करत सहाय्यक आयुक्तपदापर्यंत मजल मारली. अभ्यासू, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. संजीवन इन्स्टिटÎूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील श्रीवल्लभ चव्हाण यांचे ते वडील होत.









