प्रतिनिधी / इचलकरंजी
भारत सरकारने नुकतेच देशातील दर्जेदार उच्च शिक्षण संस्थाच्या जाहीर केलेल्या अटल-२०२० शैक्षणिक मानांकनाच्या यादीत डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयास देशपातळीवर ३३ वे मानांकन जाहिर झाले आहे. दिल्ली येथे संपन्न झालेल्या अटल रँकींग ऑफ इन्स्टीटयूटीशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंटस् पुरस्कार वितरण समारंभामध्ये देशाचे उपराष्ट्रपती एम.व्यंकया नायडू यांच्या हस्ते मानांकन यादीची ऑनलाईन घोषणा करण्यात आली. यावेळी देशाचे शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे हे उपस्थित होते.
देशभरातील सर्व राज्यांमधील उच्च शिक्षण संस्थानी या मानांकनामध्ये सहभाग घेतला होता, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अर्ज मागितले होते. यामध्ये राज्यातील ४१ उच्च शिक्षण संस्थांना मानांकन मिळाले असून कोल्हापूर जिल्हयातून डीकेटीई या एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा या यादीत समावेश झाला आहे. अटल रँकीग मानांकनाला भारताच्या सर्व प्रमुख शैक्षणिक व व्यावसायिक गटांमध्ये व्यापक मान्यता मिळाली आहे. देशामध्ये उच्च गुणवत्तेच्या संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण संशोधन व उद्योजकता निर्माण करण्यसाठी ही मानांकन यादी उपयोगी ठरणार आहे.
अटल रँकींग ऑफ इन्स्टियूटयूशन ऑफ इन्व्होवेशन पुरस्काराची सुरवात २०१८ साली शिक्षण मंत्रालयाने ( मानव संसाधन विकास मंत्रालयाने ) केली. संशोधन,विकास आणि उद्योजकता या निकषांच्या आधारावर देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे, महाविद्यालये यांची क्रमवारी ठरविण्याच्या दृष्टीने याची सुरवात करण्यात आली आहे. यामध्ये व्यावसायिक दृष्टीकोन, संशोधनाबद्दल जागरुकता, संशोधनाकरिताच्या शैक्षणिक सुविधा,आर्थिक नियोजन, शिकवण्याच्या नवनविन पध्दती तसेच पेटंट, विद्यार्थीमध्ये उद्योजगता जागृती व त्यासाठी लागणा-या पायाभूत सोयी सुविधा, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि स्टार्टअप साठी शिक्षण संस्थेमार्फत पुरविण्यात येणारे प्रोत्साहन,तसेच इन्क्युब्युशन आणि उद्योजकांची भागिदारी अशाविविध निकषांचा विचार केला जातो.
अटल मानांकनामध्ये अतिशय विस्तृतपणे सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये उद्योगाला पुरक असे अद्ययावत शिक्षण, इंडस्ट्री सर्व्हिसेस, कन्सल्टंन्सी, प्राध्यापक व विद्यार्थी गुणोत्तर, इंडस्ट्री इन्स्टिटयूटशी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय करार, संशोधन, नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रशिक्षण, प्लेसमेंट, उद्योग जगताशी असलेले संबंधाचे विश्लेषण अशा विविध मुद्यांचा विचार करण्यात आला. या सर्व बाबींची सर्वांगाने सखोल पडताळणी केल्यानंतर सहभागी झालेल्या कॉलेजीसमधून डीकेटीईला देशपातळीवर ३३ व्या स्थानावर मानांकन जाहिर केले आहे. हे इचलकरंजीसाठी भुषणावह असे आहे. या अधिही डीकेटीईस एआयसीटीई दिल्ली यांनी दोनदा ‘बेस्ट इंडस्ट्री – लिंकड् टेक्नीकल इन्स्टिटयूट‘ या देशपातळीवरील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलेले आहे तसेच इतर विविध बेस्ट इंजिनिअरींग कॉलेज करिताचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सदरच्या मानांकनामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरींग,पुणे,सरदार पटेल इंन्स्टिटयूट,मुंबई, युआयसीटी,मुंबई या मानांकित संस्थांचा सुध्दा समावेश आहे. या मानांकनासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, खजीनदार आर.व्ही.केतकर, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांचे मार्गदर्शन मिळाले. इन्स्टिटयूटचे डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डे.डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, डॉ सौ. एल.एस.आडमुठे,सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,माजी विद्यार्थी यांचा या यशात मोलाचा वाटा आहे. या रॅकींगसाठी नोडल ऑफीसर म्हणून डीन डॉ आर.एन.पाटील यांनी काम पाहिले.
आमदार प्रकाश आवाडे (डीकेटीई उपाध्यक्ष) यांचे मनोगत
देशामध्ये डीकेटीई अटल रॅकींग सर्वेक्षणामध्ये अग्रेसर राहिली हे कौतुकास पात्र आहे. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात आज नाविण्यपूर्ण संशोधनाला मोठे महत्व आहे. डीकेटीईमध्ये संशोधनासाठी सर्व लॅब सुसज्ज आहेत. या नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









