प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुर – रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर वाघबीळ घाटात दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नितीन आबासाहेब रणदिवे वय-29 वर्षे, रा.कसबा बावडा, कोल्हापुर, विशाल आबासाहेब हाके वय-29 वर्षे रा.कौलापुर जि. सांगली हे दोन युवक जागीच ठार झाले. या घटनेची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात झाली असुन ट्रक चालक अशोक महादेव पोवार रा. मलकापुर ता. शाहुवाडी यांच्यावर गुन्हा नोद झाला आहे.
नितीन रणदिवे व विशाल हाके हे दोघे विशाळगडहुन एम.एच 10 बी.सी 9797 या दुचाकीवरुन कोल्हापुरकडे घरी परत येत होते. पण या मार्गावर वाघबीळ घाटातील एका हॉटेल पुढे एम.एच.09,बी. ए 5484 या ट्रकच्या चालकाने दुचाकीला पाठीमागुन भरधाव वेगाने धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री 12:00 वाजण्याच्या सुमारास घडली.
त्यामुळे ट्रकचालकावर भरधाव वेगाने, निष्काळजीपणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटारसायकला धडक देवुन अपघात केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. या बाबतची फिर्याद बजरंग तुकाराम रिणदिवे वय-45 वर्षे रा. क.बावडा, कोल्हापुर यांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात दिली. ट्रकचालक अशोक पोवार याला ट्रकसह पन्हाळा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.









