प्रतिनिधी / कोल्हापूर
गडमुडशिंगी रोडवर फॉरेस्ट खात्याच्या जागेवर बकरी चारणाऱ्या एका मेंढपाळाचे बकरे जबरदस्तीने उचलून नेल्याप्रकरणी तिघांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली गावात राहणारे मेंढपाळ मारुती आनंदा जोग ( वय 32 ) यांनी 3 सप्टेंबर रोजी गडमुडशिंगी परिसरात शेतामध्ये बकरी वस्तीला थांबवली होती. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उमेश श्रीपती सावंत ( रा. कोलोली, ता. पन्हाळा ) सनी गोंधळी, सुप्रीम संजय सातपुते ( दोघे रा. गडमुडशिंगी ) असे तिघेजण मेंढपाळ जोग त्यांच्याजवळ आले. तुम्ही आमच्या जागेत बकरी थांबवली आहेत. त्यामुळे आम्हाला कमी किंमतीत एक बकरे द्या, जोग यांनी कमी किमतीत बकरे देण्यास नकार दिल्यामुळे तिघांनी कळपातील एक मोठे बकरे जबरदस्तीने दुचाकीवरून उचलून नेले.
मेंढपाळ जोग यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण ते निघून गेले. याप्रकरणी जोग यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात सात हजार रुपये किंमतीचे काळया रंगाचे व कपाळावर पांढरा टिपका असणारे बकरे चोरून नेल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हांगे हे पुढील तपास करीत आहेत.
Previous Articleझारखंडमधील देवघरमध्ये लवकरच होणार दुसरे विमानतळ
Next Article सिनेकलाकार, कोरोनायोद्धांचा सुखकर्ता दु:खहर्ता









