२४ तासाच्या आत कागल पोलिसांकडून छडा
प्रतिनिधी/कागल
प्रेयसीला खुश करण्यासाठी तसेच तिच्याबरोबर पळून जाण्यासाठी प्रियकराने घरफोडी केली. ती ही मावशीच्याच घराची. मात्र घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीस कागल पोलिसांनी २४ तासाच्या आत शिताफीने अटक करून चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम हस्तगत केला. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. अरुण आण्णासाहेब पवार (वय-२०, रा. काडापूर ता. चिकोडी सध्या रा. वंदूर ता. कागल) असे आरोपीचे नाव आहे. अशी माहिती कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे व तपास अधिकारी उपनिरीक्षक निखिल खर्चे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपी अरुण पवार हा मामाकडे नोकरीसाठी आला होता. त्याचे निपाणी येथील मुलीशी प्रेम प्रकरण सुरू होते. तिच्याबरोबर पळून जाण्यासाठी त्याला पैशाची गरज होती. त्यामुळे वंदूर येथील आपली मावशी सरिता सुनिल जाधव यांच्याकडे गेला होता. सरिता यांनी दिवाळीसाठी २० हजार रुपये व आपले दागिने सुरक्षित राहावेत म्हणून गव्हाच्या पोत्यात ठेवले होते. याची माहिती अरुण पवारला होती. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी मावशी शेतात भांगलण्यासाठी गेली. घरातील मामाचा मुलगा बाहेर गेला. त्यानंतर पवार यांनी घराचे कुलूप तोडून गव्हाच्या पोत्यातील ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख वीस हजार रुपये घेऊन पळून गेला. चोरीचा माल, रोख रक्कम आपल्या मित्राकडे ठेवली.
दरम्यान चोरीची फिर्याद देण्यासाठी तो आपल्या मावशी बरोबर पोलीस स्टेशनमध्ये आला होता. तपासावेळी अरुण पोलिसांबरोबरच फिरत होता. चोर घरातीलच आहे असा संशय पोलिसांना आला होता. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आरोपीच्या मित्राचा आणि त्याचा फोन नंबर मिळवला व आम्ही व्यापारी आहोत तुमच्याकडे सोने देण्याचे आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्हाला आजच सोने हवे आहे आम्ही पुढे बेंगलोरला जाणार आहोत असा फोन पोलिसांनी केला. पोलिसांना संशय आल्यानंतर आरोपी निष्पन्न झाल्यावर केवळ एका तासातच आरोपीला जेरबंद केले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी घरफोडीचा कसून तपास करून चोरी करणाऱ्या आरोपीला चोवीस तासाच्या आत अटक करण्यात आली. असे उपनिरीक्षक निखिल कर्चे यांनी सांगितले.
Previous Articleबायडेन यांचा 20 जानेवारीला शपथविधी
Next Article चित्रकार बळवंत लिमये यांचे निधन









