प्रतिनिधी/पेठ वडगाव
वडगाव येथील नवीन वसाहतीत एकाच घरातील दोघांचा कोरोना अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला. या राजकीय वर्तुळातील व्यक्तीच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. वडगाव पालिकेने तात्काळ येथील परिसर सील करून जंतुनाशक फवारणी केली. या व्यक्तीच्या घरातील अन्य सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले. या कुटुंबाच्या संपर्कात शहरातील अनेक व्यापारी, विविध क्षेत्रातील नागरिक आल्याने शहरात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता म्हणून तीन दिवसाचा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी व्यापारी व्यावसायिकातून होत आहे.
पेठ वडगाव येथील नवीन वसाहतीत रहात असलेल्या एकाच कुटुंबातील आई व मुलगा या दोघांना कोरोनाची लागण झाली. या दोघांना वारंवार ताप येत होता. यामुळे या दोघांची व घरातील अन्य सदस्यांची खासगी लॅब मध्ये कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये मुलगा व त्याची आई या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
वडगाव पालिका मुख्याधिकारी यांना याची माहिती संबंधित पदाधिकारी यांनी स्वतः दिली असता तात्काळ हे कुटुंब रहात असलेला घर परिसर सील करण्यात आला. या लोकांच्या संपर्कातील लोकांची यादी काढून त्यांच्या कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तर या कुटुंबातील सर्व सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात या कुटुंबातील सदस्य मयत झाल्याने अनेक राजकीय व विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या कुटुंबास सांत्वनास भेट दिली होती यामुळे खळबळ उडाली आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या संबंधितानी स्वतः क्वारंटाइन व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








