पुलाची शिरोली / वार्ताहर
पुलाची शिरोली ( ता. हातकणंगले )गावातील कोरोना बाधीतांची वाढणारी संख्या चिंतनिय ठरत आहे. याचाच गैरफायदा एका औषध संस्थेने घेत हजारो रुपये उकळून नागरीकांची आर्थीक लुट सुरू केली आहे .शिरोली गावात सुमारे पावणे दोनशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली आहे. त्यामुळे गाव शुक्रवार पासुन १०० टक्के कडकीत बंद केले आहे. असे असताना उचगाव ता.करवीर येथील एका औषध संस्थेचे प्रतिनिधी घरोघरी जावून औषध विक्री करत आहेत.
कोरोना संसर्गजन्य रोगावर औषध अध्यापही बाजारात उपलब्ध नाही. पण भारत सरकारने आयुष्यमान आयुर्वेदिक वनस्पती काढ्याचे दररोज सेवन करण्यास नागरीकांना आवाहन केले आहे. असे हे प्रतिनिधी सांगतात. व आपल्याकडील वेगवेगळ्या औषधांची विक्री भरमसाठ रक्कम आकारुन शिरोली गावात करत आहेत.
ही विक्री वैद्यकीय तज्ञांच्या उपस्थित करण्याची कायदेशीर गरज असताना शिरोलीत विक्री करणारा एकही प्रतिनिधी वैद्यकीय क्षेत्रातील नसुन हे लोक आपल्या मुख्य अधिकार्याच्या मार्गदर्शनाखाली विक्री करत आहेत. ही औषध विक्री करणारे लोक दोन दिवसांपासून गावात नागरीकांची पंचवीस रुपये फी आकारुन आरोग्याची मशीनद्वारे तपासणी करतात. व त्या व्यक्तीस तुमच्या शरिरात हा घटक कमी आहे , तुम्हाला हे औषध घ्यावे लागेल असे सांगून त्याला ते औषध दिले जात आहे या औषधाची जवळपास २ हजार रूपये किंमत असून ते नागरिकांना घेण्यासाठी भाग पाडत आहेत. तसेच ग्रामपंचायतीने आपणास लेखी परवानगी दिली आहे असे सांगितले जात आहे. त्यामुळे हे औषध घेण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत.
असे औषध विकणार्या कंपनीची जिल्हा आरोग्य विभागाने चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.या औषध कंपनीने आर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथिक औषध मोफत देणार आहे असे ग्रामपंचायतीच्या मिटींगमध्ये सांगितले होते. पण त्याचा आर्थिक गैरफायदा घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ए.एस.कठारे, ग्रामविकास अधिकारी पुलाची शिरोली.
Previous Articleसांगली : खानापूर तालुक्यात कोरोनाचे दिवसात 69 रुग्ण
Next Article सातारा : बेकायदा दारू विक्री प्रकरणी एक जण ताब्यात









