वार्ताहर / पुलाची शिरोली
शिरोली औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कंपनीच्या शेडवरुन पडून फॅब्रीकेशन व्यवसाईक जागीच ठार झाला. क्रूष्णात उर्फ पिंटू भिकाजी हेर्ले ( वय वर्षे ४४ ) मुळ गाव जठारवाडी ( ता. करवीर) व सद्या राहणार माळवाडी पुलाची शिरोली असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजता घडली.
कृष्णात उर्फ पिंटू हेर्ले यांचा शिरोली औद्योगिक वसाहतीत फॅब्रीकेशनचा व्यवसाय आहे. ते शिरोली औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कंपनीच्या शेडवरील पञे बदलण्याचे काम करत होते. शुक्रवारी दुपारी संपूर्ण काम आटोपून शेडवरुन खाली उतरत होते. यावेळी त्यांचा पाय अनावधानाने प्लॅस्टिकच्या पञ्यावर पडला. त्यावेळी पञा फुटून पिंटू हेर्ले हे खाली पडले. व गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ राजारामपुरी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. पण उपचाराआधीच मयत झाले. त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ, भावजयी, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
Previous Articleकर्नाटक: हुबळी तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष वॉर रूमची स्थापना
Next Article भोगावतीचे पाणी उभ्या पिकात,शेतकरी आर्थिक अडचणीत








