प्रतिनिधी / पन्हाळा
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे.कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. पन्हाळा तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट केला आहे. तालुक्यात आज दिवसभरात 30 नव्याने रुग्ण आढळले असून बाधितांचा आकडा 701 वर पोहचला आहे.
तालुक्यातील पश्चिम भागातील आसगाव येथे 06,पणोरे य़ेथे 06, बोरपाडळे येथे 04, काखे येथे 03,पडळ 02 तर उंड्री, यवलुज, सातार्डे, देवठाणे येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात एकुण आज बाधितांचा आकडा 701 झाला असून त्यापैकी 416 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. तर सध्या 282 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाने तालुक्यात 15 जणांनाचा बळी घेतला आहे. अशी माहिती पन्हाळा पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
सध्या तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे दिसु लागली आहे. कोरोनाला थोपिण्याचे मोठे आवाहान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. दरम्यान नागरिकांनी विना कारण घराबाहेर पडणे, गर्दी करणे टाळावे तसेच वारंवार हातस्वच्छ करणे, मास्क वापरावे असे आवाहान गटविकास अधिकारी तुलशीदास शिंदे यांनी केले आहे.









