प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास प्रथमच पात्राबाहेर पडले आहे. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरूच आहे.
तसेच जिल्ह्यातील एकूण 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गतवर्षी झालेल्या पावसामुळे धरणामध्ये 50 % पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील काळात महापुराचा धोका निर्माण होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे दोन दिवसातील पावसातच पंचगंगा पात्राबाहेर पडले आहे.