वार्ताहर / कबनूर
कोल्हापूर येथील एका दवाखान्यात काम करणाऱ्या तिळवणी येथील एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. गावामध्ये पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हा तरुण कोल्हापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये सेवा बजावत असल्याने तो रोज ये-जा करीत होता. त्या हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने या तरुणाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला असून सध्या या तरुणावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालय येथे उपचार चालू आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झालेली असून कोरोनाचा रुग्ण आढळलेला परिसर ग्रामपंचायतीने सील करून औषध फवारणी करून घेतली आहे. तसेच ‘त्या’ तरुणाच्या कुटुंबातील व्यक्तींना अतिग्रे येथे संजय घोडावत इन्स्टीटयुटमध्ये संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. गावात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन ग्रा.पं. प्रशासनाने केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








