प्रतिनिधी/कोल्हापूर
पत्रकारितेचा वसा आणि वारसा जोपासत गेली 100 वर्ष निर्भिडपणे वाटचाल करत असलेल्या `तरुण भारत’च्या कोल्हापूर आवृत्तीचा 28 वा वर्धापनदिन सोहळा बुधवार 30 डिसेंबर रोजी होत आहे. प्रतिवर्षी होणार भव्यदिव्य स्नेहमेळावा यंदा कोरोना संकटामुळे रद्द केला असून वर्धापनदिन साधेपणाने साजरा होईल. तथापि प्रतिवर्षी प्रमाणे यंदा `कोरोनानंतरचे जग’ हा विशेष अंक प्रसिद्ध होणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन असून त्याबरोबर कोरोना संकटात जीव धोक्यात घालून चोख कर्तव्य बजावलेल्या कोरोना योद्धÎांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी 10 वाजता कार्यक्रम होईल. तर सायंकाळी पाच वाजता प्रमुख वृत्तपत्र विक्रेत्यांचा तरुण भारत भवन मध्ये सत्कार करण्यात येणार आहे.
`तरुण भारत’चा वर्धापनदिनीचा स्नेहमेळावा वाचक, हितचिंतक, जाहीरातदारांसाठी एक पर्वणीच असते. यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्नेहमेळावा आयोजीत न करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने कोरोनानंतरचे जग ही पुरवणी प्रसिद्ध करीत आहोत. याचे प्राकाशन कार्यक्रमासाठीही प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शनक सूचनांचे काटेकोर पालन होण्यासाठी मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीती बुधवारी सकाळी दहा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन पुरवणी प्रकाशन करण्यात येणार आहे. याच वेळी कोरोनाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱया कोरोना योद्धÎांचा प्राथनिधीक स्वपरुपातसत्कार करण्यात येणार आहे.
गत वर्षभर कोरोना माहामारीचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले, अनेकजण बेरोजगार झाले. अशा कठीण आणि अडचणीच्या काळातही तरुण भारतने न डगमगता, मोठÎा धैर्याने वाटचाल सुरु ठेवली, या प्रसंगावरही मात केली. हे शक्य झाले ते केवळ आणि केवळ सुज्ञ वाचक, जाहीरातदार आणि हितचिंतक यांच्या पाठबळामुळेच, लॉकडाऊननंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. भविष्यात हितचिंतकांच्या पाठबळावर पुढील टप्पेही सहज पार होतील असा आम्हाला विश्वास आहे.
विकासाची दृष्टी ठेवून कार्यरत राहणारे विधायक दैनिक म्हणून `तरुण भारत’ने आपला लौकिक कायम ठेवला आहे. पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याची किमया `तरुण भारत’ने केली आहे. पत्रकार घडवणारे विद्यापीठ असेही तरुण भारतही ओळख तयार झाली आहे. त्याचबरोबर सीमा प्रश्नासह स्थानिक भागाच्या सर्वांगिण विकासात दूरदृष्टी ठेवून कार्यरत असलेले दैनिक ही आपली ओळख कायम राखली आहे. लाखो वाचकांच्या विश्वासाच्या आणि स्नेहाच्या जोरावर आम्ही वाटचाल दमदारपणे सुरु ठेवू, कोरोना आपत्तीमुळे आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही. परंतु आपल्या अंतरमनातील शुभेच्छा तरुण भारत परिवाराला नवा उत्साह, उर्जा देत राहतील असा आम्हाला विश्वास आहे.









