प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हय़ात मंगळवारी गेल्या 24 तासांत 1 हजार 494 नवे रूग्ण आढळले. तर 1 हजार 72 कोरोनामुक्त झाले. कोरोनाने 51 जणांचा मृत्यू झाला. सक्रीय रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. जिल्हय़ातील कोरोना बळी कमी झाल्याने प्रशासनाला कोरोना मृत्यू नियंत्रणात यश आले आहे. कोरोना मृत्यूंमध्ये जिल्हय़ातील 45 तर परजिल्हय़ातील 6 जण आहेत.
जिल्हय़ात मंगळवारी कोरोनाने 51 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 2 हजार 731 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 380, नगर पालिका क्षेत्रात 460, शहरात 599 तर अन्य 343 आहेत. मृतांत जिल्हय़ातील 45 जण आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील 30 बळींचा समावेश आहे. सक्रीय रूग्णसंख्या 11 हजार 358 झाली आहे. दिवसभरात 1 हजार 72 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 66 हजार 349 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिले.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 1 हजार 494 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 37, भुदरगड 94, चंदगड 34, गडहिंग्लज 96, गगनबावडा 17, हातकणंगले 188, कागल 101, करवीर 124, पन्हाळा 87, राधानगरी 27, शाहूवाडी 41, शिरोळ 68, नगरपालिका क्षेत्रात 127 कोल्हापुरात 375 तर अन्य 78 जणांचा समावेश आहे. कोरोनाची एकूण रूग्णसंख्या 80 हजार 489 झाली आहे. जिल्हय़ातील ग्रामीण भागात, सर्वच तालुक्यांत नव्या रूग्णांत वाढ झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून मंगळवारी 6 हजार 189 अहवाल आले. त्यापैकी 3 हजार 676 निगेटिव्हआहेत. अँन्टीजेन टेस्टचे 2 हजार 137 अहवाल आले. त्यातील 1 हजार 724 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 420 रिपोर्ट आले. त्यातील 247 निगेटिव्ह आहेत. जिल्हय़ात कोरोनाने 51 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 6 परजिल्हय़ांतील आहेत.
जिल्हय़ातील 45 जणांचा मृत्यू
दरम्यान, मंगळवारी कोरोनाने 51 जणांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हय़ातील 45 आहेत. यामध्ये नावली पन्हाळा 80 वर्षीय महिला, कुडित्रे करवीर 49 वर्षीय महिला, शिंगणापूर करवीर 80 वर्षीय महिला, नवे पारगाव 70 वर्षीय पुरूष, निमशिरगाव 90 वर्षीय महिला, कनाननगर कोल्हापूर 60 वर्षीय पुरूष, बालिंगा 65 वर्षीय महिला, बहिरेश्वर 23 वर्षीय पुरूष, बालिंगा 72 वर्षीय पुरूष, डोनोली शाहूवाडी 65 वर्षीय पुरूष, मंगळवार पेठ कोल्हापूर 55 वर्षीय पुरूष, शिरढोण 65 वर्षीय महिला, भेने मळा इचलकरंजी 82 वर्षीय पुरूष, गुरू कन्नाननगर इचलकरंजी 62 वर्षीय पुरूष, चंदूर 47 वर्षीय पुरूष, सोळगे मळा इचलकरंजी 59 वर्षीय पुरूष, कांरडे मळा शहापूर 55 वर्षीय पुरूष, इंदिरानगर कोरोची 60 वर्षीय महिला, माणकापूर चिकोडी 65 वर्षीय पुरूष, करंबळी गडहिंग्लज 72 वर्षीय पुरूष, मुत्नाळ गडहिंग्लज 54 वर्षीय पुरूष, ढेपोली गडहिंग्लज 33 वर्षीय पुरूष, गडहिंग्लज 60 वर्षीय महिला, हिरवडे खालसा 71 वर्षीय पुरूष, देवकर पाणंद कोल्हापूर 76 वर्षीय पुरूष, कडगाव गडहिंग्लज 64 वर्षीय महिला, किणये आजरा 96 वर्षीय पुरूष, टेकवडे शिरोळ 71 वर्षीय महिला, बनपुरी पाटण 30 वर्षीय पुरूष, कोडोली पन्हाळा 75 वर्षीय महिला, पारगाव 60 वर्षीय महिला, लावणमाट्टी वाळवा 55 वर्षीय पुरूष, शिरसिंगी आजरा 43 वर्षीय महिला, तळसंदे 55 वर्षीय पुरूष, साने गुरूजी वसाहत कोल्हापूर 65 वर्षीय महिला, कसबा बावडा 74 वर्षीय महिला,सरोळी आजरा 73 वर्षीय पुरूष, फणसवाडी भुदरगड 65 वर्षीय पुरूष, कवठेसार शिरोळ 66 वर्षीय महिला, हुपरी 67 वर्षीय पुरूष, कराड 51 वर्षीय पुरूष, कोडोली पन्हाळा 58 वर्षीय महिला, राजेंद्रनगर कोल्हापूर 75 वर्षीय पुरूष, चिक्कोडी बेळगाव 65 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कोल्हापूर 50 वर्षीय महिला, खासबाग कोल्हापूर 48 वर्षीय पुरूष, गारगोटी 70 वर्षीय महिला, घुणकी हातकणंगले 38 वर्षीय पुरूष, साने गुरूजी वसाहत कोल्हापूर 88 वर्षीय पुरूष आणि तिरूवल्ली तमिळनाडू येथील 37 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
Previous Articleफॅनफॉलोइंगचा गायत्रीने केला असा वापर
Next Article जायचे आहे पंढरपूरला मात्र गाडी पकडली गोव्याची
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.